पेटली मशाल, पेटली विशाल
पेटली निशा सारी पेटली दिशा
भडकला तो ज्वाला sssssss
जाळण्या अंधाराला !!
पेटली निशा सारी पेटली दिशा
भडकला तो ज्वाला sssssss
जाळण्या अंधाराला !!
मैत्री कालची वैरी झाली
जखम नव्याने गहरी झाली
खेळ मांडला पुन्हा सूडाचा
दुभांगला मावळा गडाचा
वाचा फुटली नव्याने
जुल्म अत्याचाराला !!
जखम नव्याने गहरी झाली
खेळ मांडला पुन्हा सूडाचा
दुभांगला मावळा गडाचा
वाचा फुटली नव्याने
जुल्म अत्याचाराला !!
रंग प्रीय ते झेंड्याचे झाले
कळप पुन्हा मेंढ्याचे झाले
द्वेष एकमेका अनावर झाला
माणूस पुन्हा जनावर झाला
अंधार समजुनी मारती
जो तो खऱ्या सूर्याला !!
कळप पुन्हा मेंढ्याचे झाले
द्वेष एकमेका अनावर झाला
माणूस पुन्हा जनावर झाला
अंधार समजुनी मारती
जो तो खऱ्या सूर्याला !!
मशाल कालची कधीच विझली
वस्त्या पेटविण्या आज वैरी उठली
बदलाची आशा सोडून द्या रे
दंगलीत तल्लीन झाली सारे
एक होवूनी सावध व्हारे
उधाण आले दर्याला !!
वस्त्या पेटविण्या आज वैरी उठली
बदलाची आशा सोडून द्या रे
दंगलीत तल्लीन झाली सारे
एक होवूनी सावध व्हारे
उधाण आले दर्याला !!
संजय एल बनसोडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा