अतुल तापकीर यांच्या आत्महत्यामुळे एक गोष्ट सिद्ध झाली की, समाजात फक्त महिलाच पुरूषाच्या अत्याचाराला बळी पडत नाही तर प्रियंका सारख्या अनेक महिला आहेत ज्या अतुल सारख्या अनेक पुरुषांना आत्महत्या करण्यास मजबूर करतात......
आज अतुल आमच्यातून गेला पण आपल्याला या सोशल मीडियाच्या जगात अनेक प्रश्न उपस्थित करून गेला.
सद्ध्याच्या तरुणांचे जीवनच सोशल मीडियावर ऑनलाइन झाले आहे. प्रत्यक्षात मित्रांना न बोलणारे मोबाईलवर ऑनलाइन तासंतास बोलतात.स्वतःच्या भावना सतत सोशल मीडियावर मांडणारे आजचे तरुण दिवसेंदिवस सोशल मीडियाच्या आहारी जात आहेत की काय अशी भीती निर्माण होत आहे.लग्न झाल्यानंतरही कित्येक जुने मित्र प्रत्यक्षात नाही पण ऑनलाइन सोबत असल्यामुळे कित्येकांचे घटस्फोट झाल्याचे उदाहरणे आहेत.
कित्येक पालक ऑफीसवरून घरी परतल्यावर कुटुंबाला वेळ देण्यापेक्षा मोबाईलवर ऑनलाइनच मग्न असतात.सकाळच्या नाश्ताच्या प्लेट पासून ते रात्रीच्या जेवणाच्या प्लेट पर्यंत फ़ेसबुकवर शेअर करणाऱ्यांची संख्या असंख्य आहे.लिंकवर सतत येणाऱ्या लेखमुळे पुष्कळजन न वाचतात लाईक अथवा कमेंट करून मोकळे होतात.
नेमकी समोरच्याची भावना काय त्यांचे म्हणणे काय हे न बघताच ठेंगा दाखवणारे बहाद्दर खूप आहेत फेसबुकवर. मी काय लिहले हे न वाचताच लाईक करणाऱ्या मित्रावर शेवटच्या क्षणी अतुलने दुःख व्यक्त करीत " मी काय लिहले ते न वाचताच लाईक करताय. कसे मित्र आहात तुम्ही ?"
खरे तर त्या घडीला अतुलला खऱ्या मित्राची गरज होती.पण ती घटना कोणत्याही मित्रांनी गांभीर्याने घेतली नाही. अतुलची पोस्ट वाचून मित्रांनी त्याची तेंव्हा समजूत काढली असती तर कदाचित त्याने त्याचा निर्णय बदलला ही असता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा