कविता......
पोटामधे भुक, आतडे फाडू पाहत होती
तरीही ओठात माझ्या कविताच वाहत होती !
तरीही ओठात माझ्या कविताच वाहत होती !
धान्यांची कणगी माझी कित्येक दिस खाली होती
तेंव्हाही पोटाने माझ्या कविताच व्याली होती !
तेंव्हाही पोटाने माझ्या कविताच व्याली होती !
बेरोजगार होऊन फिरत होतो कामाच्या शोधात
तेंव्हा भुकेला कविता करून चघळत होतो ओठात !
तेंव्हा भुकेला कविता करून चघळत होतो ओठात !
आप्त मिळून सारे माझे,जेंव्हा कोसत होते मला
जगण्यासाठी कामी आली तेंव्हा कवितेची कला !
जगण्यासाठी कामी आली तेंव्हा कवितेची कला !
विझवत होते वैरी जेंव्हा शब्द माझे पेटलेले
कामी आले तेंव्हा तुम्ही, मित्र मला भेटलेले !
कामी आले तेंव्हा तुम्ही, मित्र मला भेटलेले !
संजय एल बनसोडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा