शनिवार, ६ मे, २०१७

माणसाच्या रूपात, हैवान फार झाले

माणसाच्या रूपात, हैवान फार झाले
भुकेला बाहेरी, मंदीरी दान फार झाले !
जरी शोषीत गुलामीत, जीवन कंठती
तरी शोषकांचे येथे, गुणगान फार झाले !
भाकर बेईमान झाली,आज गरीबीला
श्रीमंतीला न मागता, अन्नदान झाले !
माणूस असूनही वाटे, माणसांची भीती
बेईमान सारे आज,येथे दयावान झाले !
जो तो माखलाय , जातीच्या गटारात
एक दुसऱ्या मारण्या, सारे शैतान झाले !
संजय एल बनसोडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...