शनिवार, ६ मे, २०१७

गा गाणं झुंजार



कोणताही पर्यायी मजकूर उपलब्‍ध नाही.
सूर्य गेला परतीला
राहिला अंधार
घे पेटती मशाल
गा गाणं झुंजार !!
अंधाराचे भय
ना लढणाऱ्या काजव्याला
वादळाची भीती
ना उडणाऱ्या थव्याला
वाघ होऊनी दे
दुश्मना ललकार !!
विद्रोही शस्त्र
हाती घेऊनी चालतो
मुक्या पामराला
शब्द देऊनी चाललो
 खवळला मारण्या
तो वैरी सागर !!
जरी पोटात पेटली
भाकरीची आगं
क्रांतीसाठी जगण्याचा
केलाय मी त्यागं
भीमक्रांतीची येई
ओठी हुंकार !!
घे पेटती मशाल
गा गाणं झुंजार !!
संजय एल बनसोडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...